सायकल ट्रॅक बेकायदेशीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल ट्रॅक बेकायदेशीर
सायकल ट्रॅक बेकायदेशीर

सायकल ट्रॅक बेकायदेशीर

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ ः पूर्व उपनगरातील पवई तलावालगत उभारण्यात येत असलेला सायकल ट्रॅकचा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दणका दिला. तसेच काम सुरू केलेल्या ठिकाणची जागा पूर्ववत करण्याचेही आदेश महापालिकेला देण्यात आले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पवई तलावाभोवतीच्या सायकल ट्रॅकमुळे पाणथळ क्षेत्राचे नुकसान होत असल्याचे सांगत पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला होता. प्रकल्पाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला बांधकामाला स्थगिती देत १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले म्हणणे मांडण्याची वेळ दिली होती.
दरम्यान, शुक्रवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठापुढे सायकल ट्रॅकबाबत सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर खंडपीठाने सदर प्रकल्पामुळे पाणथळ संवर्धन व व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन होत असल्याचे सांगत संपूर्ण प्रकल्पच बेकायदेशीर असल्याचे म्हटले. तसेच आतापर्यंत करण्यात आलेले बांधकाम काढून जागा पूर्ववत करावी, असेही आदेश खंडपीठाने महापालिकेला दिले.
---
स्थगिती हटवण्यास नकार
प्रकल्पाला यापूर्वी खंडपीठाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्याची मागणी
मुंबई महापालिकेची बाजू मांडणाऱ्या ॲड. जोएल कार्लोस यांनी केली. खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावली. या आदेशाला स्थगिती दिल्यास न्यायालय आपल्या आदेशाबाबत ठाम नव्हते, असा त्याचा अर्थ होईल, असे खंडपीठाने म्हटले.
---
अभ्यास करून निर्णय
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा विधीज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येऊन मुंबई महानगराच्या व्यापक हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेण्यात येईल. मुंबईकर नागरिकांच्या जनहितासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील आहे. यापुढे कायद्याच्या कक्षेत राहून काम केले जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81444 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top