वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान
वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. ७ (बातमीदार) : कोरोनाकाळात सर्वत्र भीतीचे वातावरण असताना मुंबईसह देशात घडणाऱ्या घटनांची ताजी बातमी वाचकांपर्यंत पोहचावी, यासाठी वृत्तपत्र विक्री करणाऱ्या जिगरबाज वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेना आणि नवकिरण मंडळ, अंधेरी यांच्या वतीने रविवारी (ता. ८) सायंकाळी ६.०० वाजता अंधेरी येथील चिल्ड्रेन वेल्फेअर हायस्कूल येथे हा सत्कार सोहळा होणार असल्याचे संस्थेचे मधुसूदन सदडेकर यांनी सांगितले. कोरोना पर्वात स्वतःची पर्वा न करता सांताक्रूझ ते अंधेरी, ओशिवरा, जोगेश्वरीपर्यंत सर्व डेपोमधील वृत्तपत्र विक्रेत्यांनी विक्री केली, अशा विक्रेत्यांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81449 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top