अवघ्या आठ तासांत अपहरण झालेल्या बाळाची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या आठ तासांत अपहरण झालेल्या बाळाची सुटका
अवघ्या आठ तासांत अपहरण झालेल्या बाळाची सुटका

अवघ्या आठ तासांत अपहरण झालेल्या बाळाची सुटका

sakal_logo
By

मनोर, ता. ७ (बातमीदार) ः बोईसर रेल्वे स्थानक परिसरातून मजूर कुटुंबाच्या अपहरण झालेल्या आठ महिन्यांच्या चिमुकलीचा आठ तासांत बोईसर लोहमार्ग पोलिसांनी शोध लावला. अपहरण करणाऱ्या तरुणालादेखील पोलिसांनी गजाआड केले आहे. लोहमार्ग पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव किशोर गोट्या दगळे (वय ३०, रा. केळवा) असे आहे.
शुक्रवारी वर्षा डामोर तिच्या पतीसह बोईसर रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वेरुळावर काम करत होती. काम करीत असताना तिने तिच्या आठ महिन्याच्या महिमा या मुलीला बोईसर रेल्वे स्थानकाच्या दोन क्रमांकाच्या पादचारी पुलाखालील फलाटावर झोळीत झोपवले होते. साडेअकराच्या सुमारास महिमा झोळीत नसल्याचे वर्षासोबत काम करणाऱ्या सहकारी महिलेने वर्षाला सांगितले. झोळीत बाळ नसल्याने वर्षाने टाहो फोडत बोईसर लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.
पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी नरेश रणधीर यांनी तपासाला गती देत अपहरणाची माहिती रेल्वे स्थानकावर हजर असलेले पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना दिली.
...असा लागला शोध
मुरबे येथून रेल्वे स्थानकाकडे कामासाठी आलेले गृहरक्षक दलाचे जवान योगेश तरे यांना एक व्यक्ती बाळ घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी त्या व्यक्तीसोबत असलेल्या बाळाचा फोटो काढून पोलिस ठाण्यात पाठवला. फोटोतील बाळाची ओळख वर्षा डामोर हिच्याकडून पटवल्यानंतर पोलिसांनी जवान योगेश तरे याला संपर्क साधला आणि अतिरिक्त पोलिस बल पाठवून आरोपी किशोर गोट्या दगळे याला बाळासह कुंभवली गावातून ताब्यात घेतले. पोलिस अधिकारी रणधीर यांच्या उपस्थितीत बाळाचा ताबा आई-वडिलांना देण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81450 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top