
‘अऽऽऽय...!'' ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका
मुंबई, ता. ७ ः हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा ‘अहमदनगर महाकरंडक २०२२ उत्सव रंगभूमीचा - नवरसांचा’ची महाअंतिम फेरी अहमदनगर येथील माऊली सभागृहात जल्लोषात आणि मान्यवरांच्या उपस्थित पार पडली.
या वेळी नाट्यमल्हार प्रतिष्ठान, अहमदनगरच्या ‘अऽऽऽय...!’ या एकांकिकेने प्रथम, तर अॅबस्ट्रॅक्ट आर्ट, डोंबिवलीच्या ‘हायब्रीड’ने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला १,११००० आणि उपविजेत्या संघाला ५१,१११ रुपये पारितोषिक मिळाले. अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सुपरस्टार स्वप्नील जोशी, आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला; तर अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री-निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी काम बघितले.
...
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81451 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..