
मातृदिननिमित्त आपल्या आईला काय भेट द्याल
घणसोली, ता. ७ (बातमीदार) : देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून आईची निर्मिती केली असे म्हटले जाते. हल्लीच्या धकाधकीच्या व्यावसायिक, शालेय जीवनात मुलांना आई-वडिलांना जास्त वेळ देता येत नाही. खरं तर आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणताही दिवस खास नसतो. मातृदिनानिमित्ताने आपल्या आईबद्दल आणि आपल्या आयुष्यातल्या मातृत्वाची प्रशंसा करतो.
आयुष्यभराचे प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिवस साजरा केला जातो. तो जगभरात वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. देशात उद्या (ता. ८) साजरा करण्यात येणार आहे. आईला खुश करण्यासाठी, तिला भेटवस्तू देण्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण आईला देऊ शकतो. अगदी पाच रुपयांच्या गुलाबापासून ते किचनमध्ये वापरण्यात येणारे किचन सेट, कॉस्मेटिक विविधतेच्या गोष्टी आपण आईला भेटवस्तू म्हणून मातृदिनाच्या दिवशी देऊ शकतो.
१. किचन सेट्स- तुमची आई किचनप्रेमी आणि तिला जेवण बनवायची आवड असेल तर तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरण्याजोगे साहित्य डिनर सेट, प्लेट सेट्स, कप सेट्स, विविध प्रकारचे ग्लास देता येईल.
२. कॉस्मेटिक्स- तुमच्या आईला मेकअपची खूप जास्त आवड असेल तर लिपस्टिक, हेअर पिन्स, आय शॅडो, लायनर, फाऊंडेशन यासारख्या कॉस्मेटिक वस्तू देता येतील.
३. हॅण्डबॅग- तुमची आई नोकरी करणारी असेल किंवा व्यावसायिक असेल, तर तिला तुम्ही रोज वापरायला सोयीस्कर असेल अशी बॅग देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही तिला छोटे हॅण्ड पॉकेटदेखील भेट देता येईल.
४. शोभेच्या वस्तू- तुमच्या आईला घर सजवायला फार आवडते तर फुलदाणी, वॉल पेंटिंग, वॉल फ्रेम, किंवा मैक्रेन तोरण देता येईल.
५. साडी/ड्रेसेस- साडी आणि ड्रेसेस हा प्रत्येक महिलेचा कमकुवत पॉइंट असतो. मातृदिनाच्या दिवशी आईला साडी किंवा सुंदर ड्रेस द्याल तर नक्कीच यापेक्षा सुंदर तिच्यासाठी भेट नसेल.
६. गजरा- महिलांना गजऱ्याची खूप हौस असते. तुमच्या आईला गुलाबाचे फूल आवडत असेल तर फूल द्या किंवा मोगऱ्याचा गजरादेखील एक उत्तम भेट राहील.
मातृदिनानिमित्त जास्तीत जास्त भेट स्वयंपाकासंबंधी वस्तू विकल्या जात आहेत. त्याचबरोबर परफ्युम, देवाच्या मूर्ती, फोटो फ्रेम, कॉस्मेटिक वस्तूंची ग्राहकांकडून विचारणा होत आहे.
- भावेश गांधी, दुकानदार, वाशी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81455 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..