कासाडी नदीचे पाणी प्रदूषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासाडी नदीचे पाणी प्रदूषित
कासाडी नदीचे पाणी प्रदूषित

कासाडी नदीचे पाणी प्रदूषित

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. ७ : तळोजा एमआयडीसीतून वाहणाऱ्या कासाडी नदीचे पाणी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष मुंबई आयआयटी या संस्थेने काढला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर एमआयडीसीतील वेगवेगळ्या तीन ठिकाणांहून नदीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांची तपासणी केली असता पाण्यातील द्रवरूप ऑक्सिजनची घनता कमी झाली आहे. तसेच रसायनांचे प्रमाणे वाढल्याने जलचरांना धोका निर्माण झाल्याचे निष्कर्ष काढण्यात आला आहे.

मागील अनेक दिवसांपासून तळोजातील पाण्याच्या प्रदूषणाची समस्या ऐरणीवर आली आहे. विविध सामाजिक संघटनांनी याप्रकरणी आवाज उठवल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार कासाडी नदीतील पाण्याची शुद्धता तपासणी करण्याच्या सूचना लवादातर्फे संबंधित यंत्रणांना देण्यात आले होते. तसेच मुंबई आयआयटीला याबाबतचा नियोजन आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कासाडी नदीच्या पाण्याचे प्रदूषण मोजण्यासाठी मुंबई आयआयटीच्या पथकांनी काही दिवसांपूर्वीच तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले होते. त्यांची तपासणी केली असता, रासायनिक ऑक्सिजनची मागणी आणि जैविक ऑक्सिजनची मागणी जास्तीत जास्त परवानगी मर्यादेपेक्षा जास्त असल्‍याचे दिसून आले आहे. तसेच रासायनिक घनपदार्थ विरघळलेल्याचे आढळून आले आहे.

तळोजा एमआयडीसीमधील उद्योगांमधून कासाडी नदीत विनाप्रक्रिया करता रासायनिक पाणी नदीत सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रदूषण फक्त कासाडी नदीपुरतेच मर्यादित राहत नाही, तर नदी पुढे तळोजा खाडीत वाहत जाते. त्यापर्यंत प्रदूषित पाण्यामुळे दुर्गंधी येत असल्याच्या अनेक तक्रारी या खाडी आणि नदीच्या किनारी असणाऱ्या वसाहतींमधील नागरुकांनी नोंदवल्या आहेत. तसेच तळोजा खाडीमार्गे प्रदूषित पाणी नदी आणि समुद्रात सोडले जात असल्याने खाऱ्या पाण्यातील जलचरांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदूषणामुळे जलचरांना धोका
कासाडी नदीतून घेण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यात चार मापदंडानुसार प्रदूषण मोजण्यात आले आहे. यात ‘पीएच’ श्रेणी वगळता, रासायनिक ऑक्सिजनची मागणी, जैविक ऑक्सिजनची मागणी, एकूण तरंगणारे घनपदार्थ आणि एकूण विरघळलेले घनपदार्थ यांसह इतर सर्व चार मापदंड मानक श्रेणीपेक्षा खूप वर आहेत. या पाण्यामुळे जलचर, पाण्यातील वनस्पती आदी सजीवांच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. तसेच नदीकिनारी असणाऱ्या जीवानांही धोका आहे. हे पाणी भूजलसाठ्यात मिसळले, तर ते पाणीसुद्धा प्रदूषित होईल. त्यामुळे अन्य जीवांना धोका पोहोचू शकतो, असे औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81462 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top