वादळाच्या पार्श्वभुमीवर यंत्रणा सतर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादळाच्या पार्श्वभुमीवर यंत्रणा सतर्क
वादळाच्या पार्श्वभुमीवर यंत्रणा सतर्क

वादळाच्या पार्श्वभुमीवर यंत्रणा सतर्क

sakal_logo
By

पालघर, ता. ७ (बातमीदार) : पावसाळ्याच्या दिवसांत येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, सहायक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, आयुषी सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम उपस्थित होते.
डॉ. गुरसळ यांनी शहरी भागासह ग्रामीण वस्तीत पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साचणार नाही. शहरी भागातील धोकादायक इमारती व झाडांची पाहणी करून अतिजीर्ण इमारतींवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना केली आहे. तसेच साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी आवश्यक तेवढा औषधसाठा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात उपलब्ध असावा. नियंत्रण कक्ष स्थापन करून आरोग्य पथके सज्ज ठेवावी, वीज वितरण कंपनीने वाकलेले पोल व तारेवरच्या झाडांच्या फांद्या वेळीच तोडाव्यात, असे आदेश दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81468 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top