
रोजच्या जगण्यातील `सोपे विज्ञान`
मुंबई : पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते, रॉकेट लाँचर नेमक कसे लाँच होते, आपल्या एका बोटावर स्थिर होणारे ‘बॅलेन्सिंग टॉय’ अशा अनेक प्रकारच्या खेळण्याचा विज्ञानाशी थेट संबंध आहे. अतिशय साध्या आणि सोप्या तसेच किमान गोष्टींचा वापर करत विज्ञान हे अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने शिकण्याची संधी यंदाच्या उन्हाळ्यात नेहरू विज्ञान केंद्रातील वर्कशॉपच्या माध्यमातून मिळणार आहे. तिसरी ते १० वी या वयोगटासाठी विविध प्रकारच्या विज्ञानातील संकल्पना खेळण्यांच्या तसेच मॉडेलच्या माध्यमातून शिकवणारी ही कार्यशाळा मे महिन्याच्या अखेरीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे.
शाळकरी मुलांसाठी उन्हाळी सुट्टीत विज्ञानाच्या मदतीने अत्यंत क्रिएटिव्ह अशा वर्कशॉपमध्ये सहभागी होण्याची संधी नेहरू विज्ञान केंद्राने दिली आहे. दैनंदिन जीवनातले विज्ञान सोपे करून सांगणारे असे वर्कशॉपचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे विविध वयोगटांच्या विद्यार्थ्यांना वर्कशॉपमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता तिसरी ते १० वीपर्यंतच्या मुलांना या वर्कशॉपमध्ये सहभागी होता येणार आहे. नेहरू विज्ञान केंद्रात या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष या वर्कशॉपमध्ये सहभागी होता येईल. महत्त्वाचे म्हणजे विज्ञानाची खेळणी, उपकरणे, मॉडेल्स तयार करताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना हे मॉडेल्स आणि खेळणी तयार करण्यासाठी नेहरू विज्ञान केंद्राकडून मटेरियलही पुरवण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे आपण तयार केलेले मॉडेल किंवा विज्ञानाचे खेळणे हे विद्यार्थ्यांना घरी नेण्याचीही सुविधा आहे.
कोणत्या वयोगटासाठी कोणते वर्कशॉप?
सायन्स स्पार्कल : तिसरी ते पाचवी
इलेक्ट्रॉनिक्स : सातवी ते दहावी
सायन्स टॉइज : सहावी ते आठवी
मॉडेल रॉकेटरी : सहावी ते आठवी
एक्प्लोरिंग मून : सातवी ते दहावी
रोबोटिक्स : पाचवी ते दहावी
कुठे नोंदणी कराल?
नेहरू विज्ञान केंद्राचे अधिकृत संकेतस्थळ www.nehrusciencecentre.gov.in/ या ठिकाणी अनाऊन्समेंट या सेक्शनमध्ये वर्कशॉपच्या वेगवेगळ्या वयोगटांच्या आणि विषयानुरूप लिंक देण्यात आलेल्या आहेत. तेथे या कार्यशाळेसाठी नोंदणी करता येणार आहे.
एकूण १५ प्रकारची खेळणी आम्ही या तीन दिवसांच्या वर्कशॉपमध्ये तयार करायला शिकवतो. त्यामध्ये फ्लोटिंग काईट, पेपर रॉकेट, रोअरिंग बलून, पेपर क्रॅकर, क्लॅपिंग पेपर, स्विगिंग फिश, मॅग्नेटिक पेंडूलम यांसारख्या खेळण्यांचा समावेश आहे. खेळण्यांसोबतच विज्ञानाची संकल्पनाही आम्ही सांगतो. तसेच सोप्या पद्धतीने विज्ञान शिकवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.
- मंजुळा यादव, शिक्षण अधिकारी, नेहरू विज्ञान केंद्र
दिवसभरात आम्ही विद्यार्थ्यांकडून दोन ते तीन मॉडेल तयार करून घेतो. खेळणी तयार करून घेतानाच विज्ञान या खेळण्यांमध्ये कसे काम करते हे सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसेच सोप्या गोष्टी वापरून खेळणी कशा पद्धतीने तयार करायची यासाठीही आम्ही प्रयत्नशील असतो. बॅलेन्सिंग टॉर्इज, मॅजिक कॉईन बॉस्क, स्क्रिबलिंग रोबोट, कप कॅंडेलियर, फन विथ मिरर अशा अतिशय सोप्या खेळण्यांचा यामध्ये समावेश आहे.
- चारुदत्त पुल्लीवार, शिक्षण अधिकारी, नेहरू विज्ञान केंद्र
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81469 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..