
जिल्ह्यात तापमान वाढ
बेलापूर, ता. ७ : (बातमीदार) : मार्च महिना सुरू झाल्यापासून तापमान वाढ सुरू झाली आहे. त्यातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे वातावरणात गणित आणखी बिघडले आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नवी मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही झाल्याचे दिसून येतात. दिवसेंदिवस रात्रीच्या किमान तापमानात घसरण झाली आहे, त्यामुळे उकाड्याने घामाघूम झालेल्या नवी मुंबईकरांना किंचित का होईना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह नवी मुंबई परिसरात तापमानात वाढ होत आहे. कडक उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. घरातही उकाड्याने हैराण केले आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री गारवा असे वाटत आहे. नवी मुंबईत कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात हेच कमाल तापमान ३९ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत होते. आता कमाल तापमानात घसरण झाली असली तरी वाढता उकाडा नागरिकांना घाम सोडत आहे. राज्यात उन्हाळा आणि पावसाळा असे दुहेरी हवामान असून, अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81470 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..