किन्हवली येथे आजोबांनी नातवावर कोयत्याने वार करून स्वतः केली आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किन्हवली येथे आजोबांनी नातवावर कोयत्याने वार करून स्वतः केली आत्महत्या
किन्हवली येथे आजोबांनी नातवावर कोयत्याने वार करून स्वतः केली आत्महत्या

किन्हवली येथे आजोबांनी नातवावर कोयत्याने वार करून स्वतः केली आत्महत्या

sakal_logo
By

कासा, ता. ७ (महेंद्र पवार) : डहाणू तालुक्यातील कासा पोलिस ठाणे हद्दीतील किन्हवली पिंपळपाडा येथे आजोबा राजेश होलजी आंबात (वय ५२) यांनी आपल्या घराजवळ झोपलेल्या नातू तेजसवर कोयत्याने प्राणघातक वार केले. त्‍यानंतर काही वेळातच स्वतः आत्महत्या केली.
किन्हवली पिंपळपाडा येथील आजोबा राजेश आंबात हे गेल्या महिनाभरापासून डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वागत होते. त्यांनी शनिवारी दुपारी साडेचारच्‍या दरम्यान नातू तेजस याच्या पोटावर, खांद्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती कळताच भिवा आंबात व गावकरी एकत्र जमले. त्यांनी कासा पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. ग्रामस्थ एकत्र जमल्याने राजेश आंबात त्याच्या घरात लपून बसले. लोक मारहाण करतील या भीतीने दरवाजा बंद करून बसले. रात्री साडेनऊच्‍या दरम्यान पोलिस अधिकारी श्रीकांत शिंदे पोलिस पथकासह दाखल झाले. घराच्या मागून पोलिसांनी प्रवेश केला असता आरोपी राजेश आंबात याने घरातील कपडे सुकविण्यासाठी वापरल्‍या जाणाऱ्या नायलॉन दोरीने माळ्याच्या लाकडी वाश्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. गावकऱ्यांनी तेजस यास सेलवास येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81480 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top