
फसवणुक करणारी आंतरराज्य टोळी अटकेत
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : ओएलएक्सच्या माध्यमातून महागडी दुचाकी वाहने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तींची फसवणूक करून मिळवलेली दुचाकी वाहने बनावट नंबर प्लेट व आरसीबुकच्या माध्यमातून परराज्यात विकणाऱ्या आंतरराज्य टोळीतील त्रिकुटाला गुन्हे शाखा युनिट- २ च्या पथकाने अटक केली आहे. या त्रिकुटाने अशाच पद्धतीने फसवणूक करून मिळवलेली पाच लाख ५० हजार रुपये किमतीची पाच दुचाकी वाहने गुन्हे शाखेने हस्तगत केली आहेत. या त्रिकुटाने नवी मुंबईच्या हद्दीत केलेले दोन गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी व्यक्त केली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्यांमध्ये अब्दुल कलाम शफिकुल रहमान मुजुमदार (२९), अब्दुल अजिज फैजुर रहमान लष्कर (२६) व हुज्जतहुल हुसेन नुरुल इस्लाम चौधरी (२६) या तिघांचा समावेश असून हे तिघेही आसाम राज्यातील आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81482 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..