
पहाटे अजान वाजवणाऱ्या मशिदीवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून पहाटेच्या वेळी अजान वाजवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. भोंगे वाजवल्यामुळे मुंबईत दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. वांद्रे आणि सांताक्रूझ परिसरातील दोन मशिदीशी संबंधित पदाधिकाऱ्यांवर हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंग्यावरून प्रार्थना वाजवण्यास मुंबई पोलिसांनी मनाई केली आहे. असे असताना दोन्ही मशिदींमध्ये पहाटे ५च्या पूर्वी अजान वाजवली गेली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दोन्ही गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वांद्रेच्या नुराणी मस्जिद बाजार येथे पहाटे ५ वाजता अजान पुकारली गेली. तिथे उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार वांद्रे पोलिसांनी गुरुवारी ध्वनी प्रतिबंधक नियमानुसार गुन्हा दाखल केला आहे; तर शुक्रवारी याच सांताक्रूझ भागातील कब्रस्तान मशिदीच्या दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबईत नियमावलीचे उल्लंघन करून ध्वनिपेक्षकावरून अजान वाजवणाऱ्या मशीद व्यवस्थापनाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मोहीम मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बेकायदेशीरपणे भोंगे वाजवणाऱ्या मशिदींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ४ मे नंतर मुंबईतल्या सर्व मशिदींपुढे पोलिसांची ड्युटी लावली गेली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81495 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..