माजी जेष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी जेष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे निधन
माजी जेष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे निधन

माजी जेष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे निधन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्‍येष्ठ नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी १९९२ ते २०१७ पर्यंत सलग २५ वर्षे नगरसेवक म्हणून प्रभागाचे प्रतिनिधित्व केले. या कालावधीत त्यांनी चार वर्षे स्थायी समिती सभापती पददेखील भूषवले आहे. त्यांच्या मृत्यूने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ इतके होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता मंत्रजली निवास येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. ठाण्यातील वर्तकनगर येथील शिवाई नगर पोखरण रोड १ येथे माजी ज्‍येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण हे वास्‍तव्यास आहेत. त्यांना १९९२ मध्ये ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळाले आणि नगरसेवकपदी विराजमान झाले. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासह त्यांची कुटुंबप्रमुख म्हणून विचारपूस करीत त्यांची काळजी घेत, प्रभागातील नागरिकांचा त्यांच्यावर गाढा विश्वास बसला. याच विश्वासाच्या व विकासाच्या जोरावर १९९२ ते २०१७ अशी सलग २५ वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून प्रभागाचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्यांनी महापालिकेतील चार वर्षे स्थायी समिती सभापतिपद भूषवले. तसेच परिवहन समिती सभापती, स्थायी समिती सदस्य म्हणूनदेखील त्यांनी काही काळ काम पहिले. तसेच अपक्ष म्हणून त्यांनी तिघांचे पॅनलही पालिकेवर निवडून आणले होते. मधल्या काळात त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्या वेळेसही त्यांनी मनसेचे दोन नगरसेवक निवडून आणले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81496 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top