
सोमय्या, निरंजन डावखरेंकडून मनसुख हिरेन कुटुंबियाची भेट
सोमय्या, निरंजन डावखरेंकडून मनसुख हिरेन कुटुंबीयाची भेट
माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्याकडून आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. मनसुख हे आरोपी नसून, पीडित असल्याचे ‘एनआयए’ने स्पष्ट केले. त्यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर हिरेन कुटुंबीयांना दिलासा मिळाला, असे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरेन कुटुंबीयांची माफी मागावी, अशी मागणीही केली. प्रदीप शर्मा व सचिन वाझे यांची पुन्हा पोलिस दलात नियुक्ती कशी झाली, त्यामागील सूत्रधाराचा तपास करण्यासाठी पुढील आठवड्यात ‘एनआयए’ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, असे सोमय्या यांनी सांगितले.
…...............
राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या आरोपात अडकविण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सुपारी घेतली होती. ही सुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिली होती. याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे मतदेखील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या वेळी व्यक्त केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81497 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..