तहानलेल्याला पाणी देणे हाच धर्म! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तहानलेल्याला पाणी देणे हाच धर्म!
तहानलेल्याला पाणी देणे हाच धर्म!

तहानलेल्याला पाणी देणे हाच धर्म!

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ ः ‘भुकेलेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या’ या गाडगेबाबांच्या संदेशानुसार तहानलेल्याला पाणी देणे, हाच आपला खरा धर्म आहे, असे सांगत मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा उत्कृष्टपणे देणारी मुंबई महापालिका ही देशातील सर्वोत्तम महापालिका असल्याचे गौरवोद्‍गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. गोरेगाव येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान येथे आयोजित ‘सर्वांसाठी पाणी!’ या महापालिकेच्या धोरणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

‘सर्वांसाठी पाणी’ या अभियानासाठी आपण सर्व जण प्रयत्न करत आहोत; तसेच मुंबईत पाणी साचू नये, यासाठी आणखी पम्पिंग स्टेशन उभारले जात आहे; मात्र आपल्याकडे नळातले पाणी दाखवण्याऐवजी तुंबलेले पाणी दाखवण्याची मानसिकता आहे. यंदा हिंदमाता परिसरात पाणी तुंबणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
बेस्ट उपक्रमाद्वारे देण्यात येणारी परिवहन सेवा, आरोग्य सेवा, महापालिकेच्या शाळांमधून दिले जाणारे शिक्षण हे उत्तम दर्जाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई महापालिका क्षेत्रात साधला जाणारा विकास हा पर्यावरण सुसंगत विकास आहे आणि यापुढेही असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू, आमदार राजहंस सिंह, आमदार रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.
----
हा ऐतिहासिक क्षण
मुंबई शहरामध्ये १६ विविध संस्था कार्यरत आहेत. या सर्वांना एकत्रित घेऊन मुंबई शहराला एक दिशा दिली आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण जाहीर करणे, हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81499 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top