कुटुंबातील ५ जणांचा खदानीत बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुटुंबातील ५ जणांचा खदानीत बुडून मृत्यू
कुटुंबातील ५ जणांचा खदानीत बुडून मृत्यू

कुटुंबातील ५ जणांचा खदानीत बुडून मृत्यू

sakal_logo
By

डोंबिवलीत पाच जणांचा बुडून मृत्यू
पाणीटंचाईमुळे खदानीत कपडे धुण्याची वेळ

डोंबिवली, ता. ७ ः डोंबिवलीनजीकच्या संदप येथील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या देसले पाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. पाणीटंचाईमुळे गावातील नागरिकांवर खदानीवर कपडे धुण्याची वेळ आली आहे. मृतांमध्ये सासू, सून आणि तीन नातवंडांचा समावेश आहे. अपेक्षा गायकवाड (वय ३०), मीरा गायकवाड (वय ५५), मयूरेश गायकवाड (वय १५), मोक्ष गायकवाड (वय १३), नीलेश गायकवाड (वय १५) अशी मृतांची नावे आहेत.

संदप गावासह देसले पाडा, भोपर आदी परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील महिला कपडे धुण्यासाठी खदानीतील पाण्याचा वापर करतात. शनिवारी सायंकाळच्या सुमारास देसले पाडा येथील गायकवाड कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेली होती. या वेळी पाण्यात बुडून पाचही जणांचा मृत्यू झाला.

घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.
---
घटनेचे कारण अस्पष्ट
पाचही जणांचा नेमका मृत्यू कसा झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी एक जण बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चार जणांचाही मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज मानपाडा पोलिसांनी वर्तवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81500 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top