२०० भूमित्रांची बाईक राईड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२०० भूमित्रांची बाईक राईड
२०० भूमित्रांची बाईक राईड

२०० भूमित्रांची बाईक राईड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : माती वाचवा मोहिमेअंतर्गत जनजागृती करण्यासाठी रविवारी मुंबई शहरात २०० दुचाकीस्वारांनी गर्जना केली. जमिनीचा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि ती पूर्ववत करण्याच्या तातडीच्या प्रयत्नांसाठी सद्‍गुरूंनी गेल्या महिन्यात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेचा उद्देश नागरिकांचा पाठिंबा मिळवणे आणि मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरांवर धोरणात्मक बदल घडवून आणणे आहे. सकाळी ८ वाजता गिरगाव चौपाटीच्या प्रतिष्ठित विल्सन महाविद्यालय येथून राईडला सुरुवात झाली. ११ वाजता वांद्रे फोर्ट गार्डन येथे राईडचा समारोप झाला.
सेव्ह सॉईल लोगो, फलक आणि झेंडे आणि एका खास डिझाईन केलेल्या बाइकर्सच्या टीमबरोबर बाइकर्सनी मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (यूएनसीसीडी) च्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या यंदाच्या १५ व्या सत्रात मुख्य भाषणात १९५ देशांचे राष्ट्रप्रमुख आणि राजकीय नेत्यांना सद्‍गुरू आवाहन करत त्यांच्या देशांमध्ये माती वाचवण्यासाठी धोरणात्मक सुधारणा करा, अशी विनंती करतील.
‘संपूर्ण इतिहासात, मोटारसायकल चालवणाऱ्या समुदायांनी मोठ्या कारणांसाठी रॅली काढल्या आहेत. मुंबईत माती वाचवा हा संदेश देण्यासाठी आम्हीही आमच्या मोटारसायकल घेऊन मोठ्या संख्येने बाहेर पडलो आहोत, असे मुख्य राईड आयोजक अर्जुन रमण यांनी सांगितले.
''सर्व जगभरात मातीच्या ढासळत्या स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सद्‍गुरू २४ देशांत दुचाकीवरून एकटे प्रवास करत आहेत. आपली माती आपलेच भविष्य आहे. जेव्हा या कारणाला मदत करण्यासाठी काहीतरी करण्याची संधी बाईक राईडच्या रूपात आली तेव्हा मी ती स्वीकारली. आपल्या प्रजातींच्या सुसंगत अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या या उपक्रमाला समर्थन देणे, ही प्रत्येक जिवंत व्यक्तीची जबाबदारी आहे, असे मुंबईचे ४७ वर्षीय आर्किटेक्ट आदित्य जेसवाल म्हणाले.
...
१०० दिवसांत ३० हजार किमी प्रवास...
माती वाचवण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सद्‍गुरू सध्या युरोप, मध्य आशिया आणि अरब राष्ट्रांमधून १०० दिवसांचा, ३० हजार किमी एकट्याने मोटारसायकलवर प्रवास करत आहेत. माती नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी धोरणात्मक कारवाई करण्याची तातडीची गरज दर्शवण्यासाठी ते जागतिक नेते, शास्त्रज्ञ, पर्यावरण संस्था, माती तज्ज्ञ आणि इतर भागीदारांच्या भेटी घेत आहेत.
...
भयावह अंदाज
संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेने चेतावणी दिली आहे की, वाळवंटीकरणामुळे २०४५ पर्यंत अन्न उत्पादनात ४०% घट होऊ शकते आणि जगाची लोकसंख्या नऊ अब्जांपेक्षा जास्त असू शकते. यूएनसीसीडीच्या म्हणण्यानुसार, जर माती अशीच नामशेष होत राहिली तर २०५० पर्यंत ९०% ग्रहाचे वाळवंटीकरण होऊ शकते. आजपासून तीन दशकांपेक्षाही कमी कालावधीत हे होऊ शकते.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81522 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top