नेरूळमध्ये वक्तृत्व कौशल्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरूळमध्ये वक्तृत्व कौशल्य शिबिर
नेरूळमध्ये वक्तृत्व कौशल्य शिबिर

नेरूळमध्ये वक्तृत्व कौशल्य शिबिर

sakal_logo
By

तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : शिवसेनेच्या वतीने नवी मुंबईकरांसाठी वक्तृत्व कौशल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेरूळ येथील शिबिराला प्रशिक्षक म्हणून वक्तृत्व पुरस्कारविजेते जितेंद्र पवार, नितीन चव्हाण, अंकिता पाटील यांनी प्रशिक्षण दिले. या शिबिराचा लाभ शिवसेनेच्या नगरसेवकांसह शाखाप्रमुख, विभागप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिकांसह एकूण ७० जणांनी घेतला, अशी माहिती शिवसेना नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयप्रमुख विजय चांदोरकर यांनी दिली. सामान्य शिवसैनिकदेखील आपल्या प्रभागातील लोकापर्यंत पोहचला पाहिजे, त्यांनीदेखील नागरिकांशी बोलले पाहिजे, हाच या शिबिराचा उद्देश होता, असे मत नवी मुंबई शिवसेनाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी मांडले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81545 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top