
घणसोलीतील ओपन जिमची दुरवस्था
घणसोली, ता. ९ (बातमीदार) : सध्या मॉर्निंग वॉक व स्थूलपणा कमी करण्यासाठी सेंट्रल पार्कमधील ओपन जिम एक पर्वणीच ठरत आहे; परंतु महापालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना नादुरुस्त साहित्यांकडे पाहून पाठ फिरवावी लागत आहे. महापालिका प्रशासनाने या व्यायामशाळेच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष द्यावे व स्थानिकांची हेळसांड दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हल्लीच्या धावपळीच्या जगात सर्वांना सुदृढ राहता यावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे घणसोलीतील सेंट्रल पार्कच्या बाहेरील बाजूस खुली व्यायामशाळा उभारली आहे. मॉर्निंग वॉक, ओपन जिम हे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. खुल्या व्यायामशाळेचा लाभ घेण्यासाठी शेकडो नागरिक येत होते. मात्र गेले अनेक दिवस सेंट्रल पार्कमधील खुल्या जिमची दुरवस्था झाली आहे. येथील साहित्य मोडकळीस पडल्याने नागरीकांना व्यायाम करण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे या खुली व्यायामशाळेकडे सध्या नागरिक पाठ फिरवत आहेत.
आता नागरिकांना सेंट्रल पार्कभोवती फेरी मारूनच समाधान मानावे लागत आहे. महापालिकेने लवकरात लवकर या खुल्या जिमची दुरवस्था दूर करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी बसवण्यात आलेल्या ओपन जिमचे साहित्य तुटले आहे. अनेक दिवसांपासून या साहित्याची दुरुस्ती करण्यासाठी पालिका प्रशासनाला मुहूर्त सापडलेला नाही.
- वनिता कांबळे, नागरिक
सेंट्रल पार्कमधील ओपन व्यायामशाळेतील साहित्यासंदर्भात उद्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकर दुरुस्त करण्यात येईल.
- महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81553 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..