पालेगावाला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालेगावाला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा
पालेगावाला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा

पालेगावाला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ९ (बातमीदार) ः अंबरनाथच्या पूर्व भागातील पालेगाव येथील नव्याने विकसित होणाऱ्या वसाहतीसाठी एमआयडीसीकडून दोन एमएलडी पाणीपुरवठा करण्याला मंजुरी मिळाली आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी वाढीव पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न केले होते.
पालेगाव येथे एमआयडीसीच्या बारवी गुरत्व वाहिनीवर तीन इंची जलवाहिनीतून एमआयडीसीने जोडणी दिल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास आमदार डॉ. किणीकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख शिवाजी गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बसनगार, उप विभागप्रमुख निशान पाटील, शाखाप्रमुख राजू पाटील, नरेश शेलार, महिला आघाडी वर्षा मोर्या, तसेच मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

फणशीपाड्यातील नागरिकांना दिलासा
फणशीपाडा येथील जलवाहिनीचे जुनी जोडणी बदलून मुख्य वाहिनीवर असलेल्या सहा इंची जोडणीद्वारे नवीन जोडणी दिल्याने या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे. यापूर्वी फणसीपाड्याला एमआयडीसीच्या अंतर्गत असलेल्या वितरण वाहिनीवरून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु या वितरण वाहिनीवर आवश्यकतेप्रमाणे पाणी मिळत नव्हते, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने फणसीपाड्यातील रहिवाशांना आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नव्हते. आमदार डॉ. किणीकर यांनी पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करून या ठिकाणच्या सर्व जुन्या झालेल्या वितरण वाहिन्या आमदार निधीतून बदलून घेतल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81625 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top