‘महागाई चालीसा’ सोशल मिडियावर व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महागाई चालीसा’ सोशल मिडियावर व्हायरल
‘महागाई चालीसा’ सोशल मिडियावर व्हायरल

‘महागाई चालीसा’ सोशल मिडियावर व्हायरल

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : सध्या देशभरात विशेषतः महाराष्ट्रात भोंग्यावर होणारी अजान आणि त्याविरुद्ध हनुमान चालिसा पठण हा वाद विकोपाला गेला आहे. या वादात राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. महागाई वाढत असताना हा वाद निरर्थक आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी लिहिलेली ‘महंगाई चालिसा’ व्हायरल झाली आहे.
देशात सध्या वाढत्या महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. देशात सर्वत्र जातीयतेचे विष पेरण्याचे काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया ‘महंगाई चालिसा’ वाचून सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.
महंगाई चालिसाच्या माध्यमातून तेल, डाळी, साबण यांच्या वाढणाऱ्या किमतींकडे लक्ष्य वेधण्यात आले आहे. तसेच बेकारी आणि महागाईच्या काळात निरर्थक प्रश्नांना महत्त्व न देण्याचे सांगण्यात आले आहे.

महंगाई चालिसा

मंत्री नेता दया के सागर
सत्य कभी तुम करो उजागर

मेहंगाई से जान छुडाओ
जीने से इस मौत हे बेहतर

शक्कर भी कडवी लागे
इतनी मेहंगी किमत उसकी

तेल की तो बात ना पुछो
छोड चुके हे चाहत उसकी

साबून महंगा, मंजन मेहंगा
निरमा का भी बढ गया दाम

बाल को भी तेल लागाने का
अब ना ले पाते हे नाम

तुवर, मुंग चने की दाल
मेहंगाईकी बडी मिसाल

किंमत जान कर लगता है
सोना ले रहे हे या दाल?

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81627 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top