कांदा, लसणाच्या दरात घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा, लसणाच्या दरात घसरण
कांदा, लसणाच्या दरात घसरण

कांदा, लसणाच्या दरात घसरण

sakal_logo
By

वाशी, ता. ९ (बातमीदार) : दोन महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात कांद्याचे दर १३ ते १८ रुपये किलो होते. त्‍यात आता घसरण होऊन ६ ते १२ रुपये किलोपर्यंत आले आहेत. किलोमागे कांद्याच्या दरात जवळपास सात रुपयांची घसरण झाली आहे. लसणाचे दरही दोन महिन्यांपूर्वी ४० ते ५० रुपये किलो होता. ते ३० ते ४० रुपयांपर्यंत आले आहे. या दरम्‍यान घाऊक बाजारात बटाट्याचा भाव मात्र चांगलाच वधारला आहे. बटाट्याचे दर १० ते १५ रुपये होते. आता १५ ते ५० रुपयांवर आले आहे.
कांद्याची आवक वाढल्‍याने दरात घसरण झाली आहे. उन्हाळी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात झाले असून शेतकऱ्यांनी हा कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे, तर काही माल बाजारात पाठवला आहे. पावसाळ्यापर्यंत कांद्याचे भाव असेच राहतील; पण त्यानंतर कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदा बाजारात लसणाची आवकही वाढली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, इंदूर या ठिकाणी लसूण मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे दर स्थिर आहेत. घाऊक बाजारात लसणाचे दर हे ३० ते ४० रुपये किलोपर्यंत आहेत; तर किरकोळ बाजारात ५० रुपये किलो असा आहे.
कांदा-लसणाच्या तुलनेत यंदा बटाट्याचे भाव मात्र वाढले आहेत. सध्या बाजारात मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या ठिकाणांहून बटाटा मोठ्या प्रमाणात येत आहे. मागणी वाढल्यामुळे बटाट्याच्या दरात वाढ झाल्‍याचे घाऊक बाजारातील कांदा-बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज यांनी स्पष्ट केले.

वाळवणाच्‍या लगबगीत बटाटा महागला
कडक उन्ह असल्‍याने सध्या महिला वर्गात वाळवणाचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू आहे. वाळवणाचे विविध पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या बटाट्याला गेल्‍या काही दिवसांपासून मागणी वाढली आहे. त्‍या तुलनेत आवक कमी असल्‍याने बटाटा सध्या भाव खातोय. घाऊक बाजारात १५ ते २० रुपये, तर किरकोळ बाजारात २५ रुपयांपर्यंत दराने बटाटा विक्री होत आहे.

उन्‍हाळ्यात घरगुती व व्‍यावसायिक स्‍वरूपात वाळवणाचे पदार्थ बनविले जातात. यात पापड, कुरड्या, शेवया, खारवड्या, बटाटा चिप्‍स, उपवासाच्या चकल्‍या, उपवासाचे पापड अशा विविध पदार्थांचा समावेश असतो. काही पदार्थांसाठी मुख्य सामग्री म्‍हणून बटाट्याचा वापर होतो, तर काही पदार्थांतील मिश्रणात बटाटा वापरला जातो. गेल्‍या महिनाभरापासून दैनंदिन स्‍वयंपाकासोबत वाळवणाच्‍या पदार्थांसाठीही बटाट्याला मागणी वाढली आहे. त्‍या तुलनेत सध्या बटाट्याची आवक घटल्‍याने दर वधारले आहेत. त्‍यात सध्या बाजारात गावठी बटाटाही उपलब्‍ध नाही.

चौकट
घाऊक बाजारातील दर
मे मार्च
कांदा ६ ते १२ १३ ते १८
बटाटा १२ ते १८ १० ते १५
लसूण ३० ते ४० ४० ते ५०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81629 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top