तुटलेल्या गतिरोधकामुळे अपघाताला निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुटलेल्या गतिरोधकामुळे अपघाताला निमंत्रण
तुटलेल्या गतिरोधकामुळे अपघाताला निमंत्रण

तुटलेल्या गतिरोधकामुळे अपघाताला निमंत्रण

sakal_logo
By

बदलापूर, ता. ९ (बातमीदार) ः वाहनचालकांनी वेगाला आवर घालावा म्हणून रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात येतात. बदलापूर पश्चिमेतील सानेवाडी परिसरातदेखील रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात आले आहेत. या गतिरोधकांची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी गतिरोधक तुटले आहेत. तुटलेल्या गतिरोधकावरून जाताना वाहनांचा तोल जाऊन अपघात होत आहेत. तुटलेले गतिरोधक नीट करावे; अन्यथा काढून टाकवे, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. मात्र. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष नाही.
बदलापूर पश्चिम भागातील सानेवाडी परिसर लोकवस्ती व नव्याने सुरू होत असलेल्या दुकानांनी गजबजलेला आहे. या परिसरातील रस्त्यांवर गतीवर नियंत्रण मिळवणाऱ्या गतिरोधकांची पुरती दुरवस्था झाली आहे. सगळे गतिरोधक तुटून पडल्याने, वाहनचालक बेदरकारपणे वाहन चालवत आहेत. यामुळे या रस्त्यांवर रोजच छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे. रात्री वर्दळ कमी असताना काही वाहनचालक सुसाट गाड्या चालवतात. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आपल्या लहानग्यांची, ज्येष्ठांची काळजी वाटते. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी गतिरोधक दुरुस्त करून देण्याची मागणी पालिका प्रशासनाला करूनदेखील अद्याप यावर कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या संदर्भात परिसरातील समाजसेविका संदीप नवगिरे यांनी पालिकेला अनेकदा पत्रव्यवहार केले आहेत. या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता गतिरोधक बसवण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन दिले.

सानेवाडी परिसरातील हे गतिरोधक गेल्या अनेक महिन्यांपासून या दुरवस्थेत आहे. यामुळे अनेक अपघात वाढले आहे. या संदर्भात कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करूनदेखील अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
- संदिपा नवगिरे, समाजसेविका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81630 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top