लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः कडक उन्हात उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि गुवाहाटीकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांना गर्दीत प्रवास करावा लागत आहे. प्रवासास ३६ ते ४८ तास लागत असल्याने उन्हामुळे लहान मुले आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती बिघडत आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेश वाहतूक आघाडीचे अध्यक्ष राजा सोनटक्के यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये डॉक्टर तैनात करण्याची मागणी रेल्वेमंत्री आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.
विवेक एक्स्प्रेस, एलटीटी गुवाहाटी एक्स्प्रेस, कामाख्या एक्स्प्रेस, दिल्ली दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेस, भागलपूर एक्स्प्रेस, कोलकाता मेल, गोरखपूर सुपर फास्ट ट्रेन, कुशीनगर एक्स्प्रेस यांसारख्या गाड्यांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक तास लागतात. एवढेच नाही तर उन्हाळ्यातही बहुतांश गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे कडक उन्हात ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राजा सोनटक्के यांनी म्हटले की, उन्हाळ्याच्या काळात उत्तर भारत, बिहार आणि ईशान्य भारतातून मोठ्या संख्येने प्रवासी गावाला भेट देतात. रेल्वे भाड्याव्यतिरिक्त रेल्वे विभाग प्रवाशांकडून जीएसटीही वसूल करतो. मात्र गाड्या प्रवाशांना पुरेशा सुविधा देत नाहीत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांची प्रकृती खालावल्याने प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी रेल्वे विभागाने प्रत्येक ट्रेनमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करावी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81636 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top