
नॅशनल पार्कमधील प्राण्यांसाठी थंडावा
नॅशनल पार्कमधील प्राण्यांसाठी थंडावा
‘शिवतेज’तर्फे ११ कूलर भेट
मुंबई, ता. ९ ः बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मुक्या प्राण्यांना उन्हाळ्याचा तडाखा सुसह्य व्हावा यासाठी शिवतेज आरोग्य संस्थेच्या वतीने नुकतेच तेथे ११ कूलर्सचे वाटप करण्यात आले.
निसर्गतः काही प्राण्यांना उन्हाचा त्रास होत नाही, पण काहींच्या शरीररचनेमुळे त्यांना ऊन सोसवत नाही. उन्हाळ्यात अशा प्राण्यांसाठी नेहमीच वेगवेगळे उपाय केले जातात. या उद्यानातील प्राणी ही राष्ट्रीय संपत्ती असून ते नैसर्गिक अधिवासात नसल्याने त्यांना पर्यावरण हानीमुळे होणारा हवामान बदलाचा त्रास जाणवू शकतो. या त्रासास माणूसच मुख्यत्वे कारणीभूत असल्याने त्या प्राण्यांना अंशतः तरी दिलासा देण्याची जबाबदारी आपलीच आहे, या भावनेतून युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांच्या शिवतेज संस्थेतर्फे नुकतेच हे कूलर वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाराध्ये यांना देण्यात आले.
शिवतेजतर्फे अन्य समाजोपयोगी कामेही करण्यात आली असून यात गरजूंना विमाछत्र देणे, खासगी संस्थांच्या साह्याने लशीचे डोस देणे आदींचा समावेश होता. त्याखेरीज शिवतेजतर्फे आतापर्यंत अनेक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून प्रत्येक मेळाव्यात किमान अडीच हजार तरुणांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या दिल्या जातात, असेही कदम यांनी सांगितले.
...
दिलासा देण्याचा प्रयत्न
मी स्वतः प्राणिप्रेमी, तसेच पर्यावरणप्रेमी असल्याने प्राण्यांसाठी शक्य होईल ते मी करतच असतो. या वेळच्या भीषण उन्हाळ्यात आपली वाईट अवस्था होते, तर पिंजऱ्यातील प्राण्यांचे काय होत असेल या कल्पनेतून हे कूलर देण्याचे आम्ही ठरवले. या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर म्हणजेच जंगलांवर माणसांनी उभारलेल्या काँक्रीटच्या जंगलांचे अतिक्रमण होत आहे. त्यामुळे प्राण्यांची संख्याही कमी होत असल्याने निसर्गचक्रही बिघडते आहे. अशा स्थितीत या प्राण्यांना दिलासा देण्याचा हा छोटासा प्रयत्न केला, असे सिद्धेश कदम यांनी याबाबत ‘सकाळ’ला सांगितले.
...
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81637 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..