नेहरूनगर परिसरात अस्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेहरूनगर परिसरात अस्वच्छता
नेहरूनगर परिसरात अस्वच्छता

नेहरूनगर परिसरात अस्वच्छता

sakal_logo
By

कुर्ला, ता. ९ (बातमीदार) ः कुर्ला पूर्वेतील नेहरूनगर परिसरात अस्वछतेचे प्रमाण वाढत चालले आहे. नेहरूनगर मार्गाच्या कडेला विद्युत पेट्यांखाली पाण्याच्या पाईपलाईन आहेत. त्या फुटलेल्या असल्याने मार्गाची अवस्था गलिच्छ झाली आहे. काही भागात गटाराच्या पाण्याने दलदल तयार झाली आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना त्रास होत आहे. वीजपेट्यांच्या खालीच गटाराचे पाणी जमा होते. त्यामुळे वीजपेटीमध्ये पाणी जाऊन शॉर्टसर्किट होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात तिथे अधिक पाणी साचून ही समस्या वाढू शकते. महापालिकेने पावसाळ्याआधीच याची दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81639 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top