
अधिकाऱ्यांनी केली स्मशानभूमीची पाहणी
धारावी, ता. ९ (बातमीदार) : हिंदू धर्मीयांसाठी असलेल्या स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याबाबतचे वृत्त सोमवारी (ता. ९) ‘सकाळ’मध्ये ‘अंतिम वाटेवरही अडथळ्यांचा त्रास’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. त्याची त्वरित दखल घेत पालिकेच्या ग/ उत्तर विभागातील आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक किशोर नाईक व अजय परब यांनी स्मशानभूमीतील अडचणींची आज पाहणी केली.
ज्येष्ठ समाजसेवक गिरीराज शेरखाने यांनी पालिकेशी याबाबत पाठपुरावा केला होता. यासंदर्भात बोलताना किशोर नाईक यांनी परिस्थिती खूपच खराब आहे, हे दिसते आहे. यात विविध विभागांचा सहभाग घ्यावा लागेल. आम्ही आमचा अहवाल वरिष्ठांना देऊ. ते पुढील निर्णय घेतील, असे सांगितले. रस्ता खोदून ठेवल्याने रुग्णवाहिका स्मशानभूमीत जाऊ शकत नाही. स्मशानभूमीच्या वाटेवर अतिक्रमण वाढले आहे. मुख्य दारासमोर दुचाकी, चार चाकी वाहने उभी केली जात असल्याने अडचणीत भर पडत आहे. या समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81646 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..