झारा जब्बारची वर्ल्ड स्कूल गेम्ससाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झारा जब्बारची वर्ल्ड स्कूल गेम्ससाठी निवड
झारा जब्बारची वर्ल्ड स्कूल गेम्ससाठी निवड

झारा जब्बारची वर्ल्ड स्कूल गेम्ससाठी निवड

sakal_logo
By

घणसोली, ता. ९ (बातमीदार) : जलतरण चॅम्पियन असणारी १५ वर्षीय झारा जब्बार आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या वर्ल्ड स्कूल गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. फ्रान्समधील नॉर्मंडी येथे १४ मे ते १९ मेदरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. नवी मुंबईची रहिवासी असणारी झारा मुंबईतील ऑटर्स डॉल्फिन अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी आहे. ती आता राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर विजेतेपद मिळवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ वर्ल्ड स्कूल गेम्स २०२२ साठी भारतीय तुकडीतील सदस्य म्हणून तिची निवड झाली होती. झाराने गेल्या महिन्यात पुण्यात शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या पात्रता चाचण्यांमध्ये भाग घेतला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81650 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top