ठाण्यात तीन अपघातात दोन जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात तीन अपघातात दोन जण जखमी
ठाण्यात तीन अपघातात दोन जण जखमी

ठाण्यात तीन अपघातात दोन जण जखमी

sakal_logo
By

ठाणे, ता. ९ : शहरातील घोडबंदर रोड आणि मुंबई-नाशिक महामार्गावर काही तासांच्या अंतरावर झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातांनी दोन्ही रस्त्यांवर जवळपास दोन-दोन तास वाहतूक कोंडी झाली होती.
पहिला अपघात कापूरबावडी तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नलजवळ रविवारी रात्री १२ च्या सुमारास घडला. यात घोडबंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या घटनेत कारमालक नरेंद्र गेरवाल (बाळकूम) यांच्या डाव्या हाताला व डोक्याला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. कापूरबावडी पोलिसांनी हायड्राच्या मदतीने अपघातग्रस्त दोन्ही वाहने रोडच्या बाजूला केली. दुसरा अपघात पुन्हा विद्यापीठ सिग्नलजवळच मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास घडला. घोडबंदर-ठाणे मार्गावर रस्त्यालगत असलेल्या झाडाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत झाड रस्त्यावर कोसळले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासाने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
तिसरा अपघात सोमवारी पहाटे ४.२० च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा पुलाजवळ घडला. डेब्रिज घेऊन जाणाऱ्या डम्परचालकाचे नियंत्रण सुटून तो सिमेंट मिक्सर आणि अन्य एका डम्परला धडकला. यात रामचंद्र प्रजापती (३५) अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्पेडर कटरच्या मदतीने व आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुमारे २५ मिनिटांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातात प्रजापती यांच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघाताच्या सुमारे दोन तासानंतर नाशिक-मुंबई रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81654 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top