सेंट जॉर्ज रुग्णालयाची ओपीडी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट जॉर्ज रुग्णालयाची ओपीडी सुरू
सेंट जॉर्ज रुग्णालयाची ओपीडी सुरू

सेंट जॉर्ज रुग्णालयाची ओपीडी सुरू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात सोमवारपासून पुन्हा सर्वसामान्य रुग्णांसाठी बाह्य रुग्ण विभागाला (ओपीडी) सुरुवात झाली. रविवारी रात्री उशिरा सेंट जॉर्ज रुग्णालय प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारपासून सर्व नॉनकोविड ओपीडी सुरू केल्या आहेत. सकाळी आठपासून या ओपीडीला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी १० च्या सुमारास ओपीडीबाहेर रुग्णांच्या रांगा पाहायला मिळाल्या. पहिलाच दिवस असल्याने जास्त गर्दी नोंदली गेली नाही.
सेंट जॉर्ज रुग्णालयात कोविड साथीनंतर पहिल्यांदाच नॉनकोविड सुविधा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे आता रखडलेल्या शस्त्रक्रिया किंवा उपचार, दैनंदिन तपासणीसाठी ओपीडीत येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान ओपीडीत जवळपास १०० ते १५० रुग्णांची नोंद झाली. स्त्रीरोग ओपीडीत सध्या गायनॅकचे रुग्ण पाहिले जातील. पिडियाट्रिक विभागातही सध्या ओपीडी सुरू राहणार आहेत.

मनुष्यबळाची कमतरता असल्याने एक-एक ओपीडी सुरू करण्यात आली आहे. सध्या कोविडव्यतिरिक्त रुग्णालयात दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेवर काम सुरू आहे. पुढच्या १५ दिवसांत त्यावरही तोडगा काढून रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल.
- डॉ. आकाश खोब्रागडे, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

युरोलॉजी ओपीडी पुढील महिन्यात
सध्या सर्व ओपीडी सुरू करण्यावर भर दिला जात आहे. मेडिसिन विभागातील रुग्णांना दाखल करून घेण्याची गरज पडल्यास त्याबाबतचा निर्णय संबंधित विभागातील डॉक्टर घेतील. मात्र, सध्या शस्त्रक्रियेचे रुग्ण दाखल करून घेतले जाणार नाहीत. ओपीडीत आलेल्यांना तपासले जाईल. सध्या मॉड्युलर ओटी सुरू आहे. फक्त युरोलॉजी आणि प्लास्टिक सर्जनची ओपीडी पुढच्या महिन्यापासून सुरू केली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81657 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top