‘अक्षय पात्र-अरामको’ची कोरोनाग्रस्तांसाठी मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अक्षय पात्र-अरामको’ची कोरोनाग्रस्तांसाठी मदत
‘अक्षय पात्र-अरामको’ची कोरोनाग्रस्तांसाठी मदत

‘अक्षय पात्र-अरामको’ची कोरोनाग्रस्तांसाठी मदत

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ ः सौदी अरेबियातील अवाढव्य तेल-ऊर्जा कंपनी अरामकोने अक्षय पात्र फाऊंडेशनच्या साह्याने दीड कोटी रुपये खर्च करून कोरोनाग्रस्तांना अन्न देण्याचे ठरवले आहे. राज्यातील सात लाख कुटुंबांना याचा लाभ होईल.
देशातील कोविडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीही त्यांच्यातर्फे मदत केली जाईल. या उपक्रमातून पहिल्या टप्प्यात दिल्लीत पाच लाख नागरिकांना; तर नागपूर, ठाणे, पनवेल व पुणे येथे सुमारे दीड लाख लोकांना जेवण दिले जाईल, असे अरामको एशिया इंडियाचे मोहम्मद एस. अल-हर्बिश म्हणाले. यापूर्वीही त्यांनी वैद्यकीय साहित्य व उपकरणांसाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीला पाच लाख डॉलर दिले होते. अशा उपक्रमांनीच कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होईल, असे अक्षय पात्र फाऊंडेशनचे सीएमओ संदीप तलवार म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81658 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top