कल्याण शीळ रस्त्यावर अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण शीळ रस्त्यावर अतिक्रमण
कल्याण शीळ रस्त्यावर अतिक्रमण

कल्याण शीळ रस्त्यावर अतिक्रमण

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ९ ः कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करत सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसीच्या वतीने सुरू आहे. या रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर देखील गॅरेज चालकांनी अतिक्रमण करीत आपले बस्तान मांडले आहे. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येत आहेत. यामुळे रस्त्याची एक लेन पूर्णपणे या वाहनांनी अडविली जात आहे.
शीळफाटा भागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. येथील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी पुरेशा सुविधा नसल्याने अनेकजण त्यांच्या खासगी वाहनानेच नवी मुंबई, ठाणे, मुंबई गाठत असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा मोठा भार येत असतो. वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता कॉंक्रीटीकरण करण्याचा, तसेच रुंदीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. एमएसआरडीसीच्या वतीने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. स्थानिक पालिका प्रशासनाच्या मदतीने रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे हटविणे व इतर गोष्टी केल्या जात आहेत. चक्की नाका, टाटा पॉवर परिसर, सोनारपाडा, दावडी, म्हात्रे नगर, मानपाडा ते काटई नाकापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गॅरेज चालकांनी आपले बस्तान थेट रस्त्यावर मांडले आहे. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी दुचाकी, चारचाकी वाहने सिमेंटच्या रस्त्यावर उभी केली जातात. यामुळे सिमेंटच्या रस्त्याची पूर्ण एक लेन या गॅरेज धारकांनी व्यापली आहे. गॅरेजमध्ये येणारी काही वाहने तर वर्षानुवर्षे धूळखात रस्त्यावर उभी आहेत. तसेच काही खासगी बसमालक आपली वाहने या रस्त्यावर उभी करताना आढळून येतात. रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम आणि दुतर्फा असलेल्या या गॅरेज चालकांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.

रस्त्याचे काम सुरू आहे, काही ठिकाणी पाच लेनचे सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सकाळ- संध्याकाळ गर्दीच्या वेळेस चारचाकी व अवजड वाहनांमुळे दोन लेन पूर्णपणे व्यापल्या जातात. तसेच अगदी रस्त्यावर गॅरेज चालकांची वाहने उभी आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवते.
- प्रशांत लिमये, प्रवासी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81664 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top