पनवेलकरांना १ जूननंतर भूर्दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलकरांना १ जूननंतर भूर्दंड
पनवेलकरांना १ जूननंतर भूर्दंड

पनवेलकरांना १ जूननंतर भूर्दंड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

पनवेल, ता. ९ : पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना १ जूननंतर थकीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. ३१ मेपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी महापालिकेने वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या आहेत; मात्र मालमत्ता कर भरण्याबाबत राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी विरोध केल्यामुळे काही नागरिकांनी पाठ फिरवली आहे, परंतु ३१ मेनंतर महापालिकेने दिलेल्या सर्व सवलती बंद होणार असल्याने त्यानंतर कर भरणाऱ्यांना सवलती रद्द होणार आहेत. उलट मालमत्ता कर उशिरा भरणाऱ्यांना दोन टक्के व्याज आकारले जाणार आहे.
२०१६ ला पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यापासून करआकारणी करण्यात आलेली नाही. नगरपरिषदेचे रूपांतर थेट महापालिकेत झाल्यानंतर कर निर्धारण उशिराने झाल्यामुळे दोन वर्षांपासून मालमत्ता कर वसुलीला सुरुवात झाली, परंतु महापालिकेतर्फे मिळणाऱ्या सुविधांचे कारण पुढे करून मालमत्ता कराविरोधात शंख फुंकल्याने सध्या मालमत्ता कराचा मुद्दा गाजतो आहे. तरीसुद्धा जास्तीत जास्त लोकांनी मालमत्ता कर भरावा, जेणेकरून महापालिकेची आर्थिक पत सुधारून नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा देता येतील, यासाठी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी वेगवेगळ्या स्तरावर सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार देयके मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के सवलत मिळणार आहे. तसेच ऑनलाईन कर भरणा केल्यास आणखी दोन टक्के अशी एकूण सात टक्‍क्‍यांपर्यंत सवलती मिळत आहेत. मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये १०० टक्क्यांपासून ते २५ टक्क्यांपर्यंतची सवलत जाहीर करण्यात आली आहे.

भरघोस सवलती
महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार शास्ती फी किंवा वसुली खर्च माफ करण्याचा अधिकार आयुक्‍तांना आहे. या कायद्यानुसार आयुक्तांनी शास्तीमध्ये सवलत देण्याचा आदेश जाहीर केला. त्‍यात मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी शास्तीमध्ये १०० टक्क्यांपासून ते २५ टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली आहे. एकरकमी कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे. मालमत्ताधारकांनी विहित वेळेत कर भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिकेने केले आहे.

३१ मेनंतर दोन टक्के व्याज
पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना मालमत्ता कर भरणाऱ्यांना बिल दिल्यापासून एक महिन्यात भरले तर पाच टक्के सवलत मिळणार आहे. ऑनलाईन भरले तर दोन टक्के सवलत मिळणार आहे. ३१ मेपर्यंत सवलत आहेत. नंतर सवलती रद्द होणार आहेत. ३१ मेपर्यंत दंड आकारला जाणार नाही. थकीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना मूळ रकमेवर दोन टक्के व्याज लागणार आहे. जप्तीचे आदेश काढल्यास मूळ रकमेवर प्रतिमहिना दोन टक्के फी लागणार आहे.

मालमत्ता कर भरणाऱ्यांना अनेक सवलती जाहीर केल्‍या आहेत; मात्र आता न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई महापालिका करणार नाही, परंतु महापालिकेने दिलेल्या सवलती रद्द होणार आहेत. तसेच त्यावर शास्ती लागू होणार आहेत.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81677 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top