
रेडिरेकनरे अडवली पुनर्विकासाची वाट
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः शहर आणि उपनगरातील म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास होत असताना या प्रक्रियेत सोसायट्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चेंबूर येथील म्हाडाच्या ५० वर्ष जुन्या इमारतींना रेडिरेकनरचा फटका बसत असल्यामुळे पुनर्विकासाचा मार्ग खडतर झाला आहे. पुष्कराज-२ को ऑफ हाऊसिंग सोसायटीच्या ५४, ५५ आणि ५६ या म्हाडाच्या इमारतींना पुनर्विकासात रेडिरेकनरचा दर अडथळा निर्माण करत असल्यामुळे या इमारतींचा पुनर्विकासही थांबला आहे.
चेंबूर सुभाष नगर परिसरात ५० हून अधिक म्हाडाच्या जुन्या इमारती पुनर्विकासाच्या प्रक्रियेत आहेत. मात्र विविध कारणांमुळे येथील पुनर्विकासाच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. पुष्कराज-२ सोसायटीचा पुनर्विकासही यामुळे थांबला आहे. शेजारच्या परिसरातील इमारतींपेक्षा या तीन इमारतींचा रेडिरेकनर दर अधिक असल्यामुळे कोणताही विकसक अथवा कॉर्पोरेट कंपनी पुनर्विकास करण्यास सहमती दर्शवित नाहीत. विकसकांच्या माध्यमातून पुष्कराज-२ येथील ९६ सदस्य असलेल्या म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास नाकारत असल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.
रेडिरेकनरचा दर अधिक असल्याने हा फटका बसत आहे. हा दर कमी करण्यात यावा याकरिता सरकारच्या महसूल विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र यावर अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे सोसायटीचे रहिवासी निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत.
- चंद्रशेखर गणाचारी, रहिवासी, पुष्कराज सोसायटी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81678 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..