राज्यात दिवसभरात १२१ नवीन कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात दिवसभरात १२१ नवीन कोरोना रुग्ण
राज्यात दिवसभरात १२१ नवीन कोरोना रुग्ण

राज्यात दिवसभरात १२१ नवीन कोरोना रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : राज्यात सोमवारी एकूण १२१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. रुग्णांमध्ये किंचित घट नोंदवण्यात आली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ७८,७९,३९९ झाली आहे. आज ८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३०,२०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे.
दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण १३४३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस सक्रिय रुग्णही वाढत आहेत.

राज्यात सोमवारी एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत एकूण १,४७,८४७ एवढे मृत्यू नोंदवले गेले आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०३,९६,७२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७९,३९९ (०९.८४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81700 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top