डॉक्टरची ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime news Online fraud Rs 65000 of doctors
डॉक्टरची ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

डॉक्टरची ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

नवीन पनवेल : क्रेडिट कार्डची केवायसी करायची असल्याचे सांगून ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे येथे घडला आहे. अज्ञात आरोपीविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर ३६, कामोठे येथील डॉ. शिव लक्ष्मण पाटील यांचे बचत खाते कामोठे ॲक्सिस बँकेत आहे. ते घरी असताना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून बँकेमधून बोलत असल्याचे सांगितले. या वेळी क्रेडिट कार्डची केवायसी करायचे आहे, असे सांगून समोरील व्यक्तीने क्रेडिट कार्डचा क्रमांक मागितला. या वेळी शिव यांनी क्रेडिट कार्डचा क्रमांक सांगितला. त्यानंतर काही वेळाने त्यांना क्रेडिट कार्डवरून ६५ हजार काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर फसवणूक झाल्याने पाटील यांनी कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तरुणाची आत्महत्या
नवीन पनवेल अज्ञात कारणावरून एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेलजवळील कोळखे गावाच्या हद्दीत घडली. या ठिकाणी राहणाऱ्या सनी मुंडे (वय २३) याने राहत्या घरात सीलिंग पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81701 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top