बोर्डीत आरोग्यविषयक मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डीत आरोग्यविषयक मार्गदर्शन
बोर्डीत आरोग्यविषयक मार्गदर्शन

बोर्डीत आरोग्यविषयक मार्गदर्शन

sakal_logo
By

बोर्डी, ता. ९ (बातमीदार) ः सोमवंशी क्षत्रिय वाडवळ समाज महिला मंडळ, बोर्डी यांच्यातर्फे महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिर व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या शिबिरात डॉ. प्रांजली वैभव सावे यांनी मानसिक व शारीरिक स्वास्थ्य आणि डॉ. साधना तिवारी यांनी फिजिओथेरपी या विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात वाडवळ समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता चुरी यांनी केले; तर रश्मी राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81707 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top