डहाणुत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणुत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा बळी
डहाणुत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा बळी

डहाणुत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा बळी

sakal_logo
By

डहाणू, ता.९(बातमीदार) : डहाणू येथील समुद्रात चार दिवसापूर्वी मित्रासोबत पोहायला गेलेल्या नरपड येथील ओम म्हात्रे या सेंटमेरी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. डहाणू पोलिसांनी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या साह्याने शोध मोहीम राबवून, त्यांचा शोध घेतला. सध्या शाळेला सुट्टी असल्याने ओम म्हात्रे चार मित्रांसमवेत जवळच्या समुद्रात पोहायला गेला होता. बऱ्याच वेळाने ओम म्हात्रे हा समुद्रात बुडाल्याचे त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी सांगितले. डहाणू पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस,जीवन रक्षक, मच्छीमार, आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. दुपारी भरतीच्या वेळी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या साह्याने शोध घेतला असता, डहाणू आगर समुद्रकिनाऱ्याजवळ त्याचा मृतदेह सापडला.
दुसरी घटना शनिवार रात्री आठ वाजता घडली. दहा दिवसांपूर्वी तारापूर एमआयडीसीत एका कारखान्यात कामावर लागलेला चेतन सुरेश राऊत (वय २४ ) हा तरुण स्कुटीने कामावर जात असताना, तारापूर कुडणजवळ त्याला अज्ञात रिक्षाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला जबरमार बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तारापूर येथील प्राथमिक रुग्णालयात नेत असताना तो गतप्राण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्याचा मृतदेह रविवार ता.8 रोजी बहाड येथे त्याच्या राहत्या घरी नेण्यात आला.त्याच्या निधनाने बहाड गावात एकही चूल पेटली नाही. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.
तिसऱ्या घटनेमध्ये रविवार ता 8 रोजी धावत्या जम्मू-तावी एक्सप्रेसच्या शौचालयात,बिहारची रहिवासी असलेल्या आरती कुमारी मिथिलेश मंडल या महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असून,तिच्यासोबत असलेल्या इसम पळून गेला आहे,याबाबत डहाणू पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81710 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top