पतीची वाशी खाडी पुलावरुन उडी टाकुन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतीची वाशी खाडी पुलावरुन उडी टाकुन आत्महत्या
पतीची वाशी खाडी पुलावरुन उडी टाकुन आत्महत्या

पतीची वाशी खाडी पुलावरुन उडी टाकुन आत्महत्या

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : २७ मार्च रोजी वाशी खाडी पुलावरून उडी टाकून आत्महत्या करणाऱ्या रामू अंजनी अरगेली (३१) या व्यक्तीने पत्नीकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी मृत रामू अरगेली याची पत्नी मेरी अरगेली हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. या घटनेतील मृत रामू अरगेली हा मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये पत्नी व मुलासह राहत होता. तसेच तो नवी मुंबईतील एका कुरिअर कंपनीत टेम्पोचालक म्हणून काम करत होता. २७ मार्च रोजी सायंकाळी रामू कामावरून सुटल्यानंतर तो मुंबईला जाणाऱ्या कंपनीच्या टेम्पोतून घरी जाण्यास निघाला होता. सदर टेम्पो वाशी खाडी पुलावर मध्यभागी आल्यानंतर रामूने उलटीसारखे होत असल्याचे सांगितल्यानंतर टेम्पोचालक अजय चिखले याने टेम्पोचा वेग कमी केल्यानंतर रामूने चालत्या टेम्पोतून खाली उतरून वाशी खाडी पुलावरून उडी टाकून आत्महत्या केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81714 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top