पिस्तुलासह जिवंत काडतुस बाळगणारा तरुण अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिस्तुलासह जिवंत काडतुस बाळगणारा तरुण अटकेत
पिस्तुलासह जिवंत काडतुस बाळगणारा तरुण अटकेत

पिस्तुलासह जिवंत काडतुस बाळगणारा तरुण अटकेत

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : नेरूळ रेल्वे स्टेशनजवळ फोक्सवेगन वेन्टो कारमधून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुस घेऊन आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने सापळा रचून अटक केली आहे. शारुन कुन्नीक्रिशनन शालीन (२६) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेले देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे तसेच त्याच्या ताब्यात असलेली फोक्सवेगन कार जप्‍त केली आहे. या तरुणाने सदरचे पिस्तूल कुठून व कशासाठी आणले याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
बेकायदेशीर शस्र बाळगणारा एक तरुण नेरूळ रेल्वे स्टेशनलगतच्या पूर्व भागातील पार्किंगमध्ये फोक्सवेगन कारमधून येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक संजय रेड्डी व त्यांच्या पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक भोसले यांच्या सूचनेनुसार ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात पार्किंग आवारात सापळा लावला होता. काही वेळानंतर त्या ठिकाणी कार आली असता पोलिसांनी कारचालक शारुन कुन्नीक्रिशनन शालीन याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल व त्यात दोन जिवंत काडतुस आढळून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81715 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top