शिवसेनेकडून लीलावती रुग्णालय धारेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेकडून लीलावती रुग्णालय धारेवर
शिवसेनेकडून लीलावती रुग्णालय धारेवर

शिवसेनेकडून लीलावती रुग्णालय धारेवर

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ ः खासदार नवनीत राणा यांची लीलावती रुग्णालयात एमआरआय करतानाचे फोटो व्हायरल झाल्याने शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णाची तपासणी करताना फोटो काढणे, एकापेक्षा जादा व्यक्ती उपस्थित राहणे, आदी नियमांचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे, महापौर किशोरी पेडणेकर, अनिल कोकीळ, राहुल कनाल यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला.

नवनीत राणा यांना पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यामुळे कारागृहातून सुटल्यावर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र रुग्णालयात तपासणी करताना फेसबुक लाईव्ह करणे, एमआरआय चाचणीवेळी रुग्णाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करणे योग्य आहे का, असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारला. सदर फोटो आणि व्हिडीओ करण्याबाबत रुग्णालय प्रशासनावर कुणाचा दबाव होता का, असाही सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी विचारला. याबाबत आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
---
किशोरी पेडणेकरांची सरबत्ती
एमआरआय कक्षाचा दरवाजा बंद केल्याशिवाय नवनीत राणा यांचा एमआरआय चाचणी कशी करण्यात आली, एमआरआय नक्की करण्यात आला का, चाचणीवेळी फोटो काढण्यासाठी कुणी परवानगी दिली, रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच रुग्ण माध्यमांना प्रतिक्रिया कशी काय देतो, असा सवाल विचारत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारला.
---
फोटो काचेतून घेतला
शिवसेनेचे राहुल कनाल यांनी नवनीत राणा यांचा खरंच एमआरआय झाला का, असा सवाल उपस्थित केला. त्यावर रुग्णालय प्रशासनाने एमआरआय झाल्याचा खुलासा केला. एमआरआयच्या ठिकाणी काचेतून फोटो घेतल्याचा दावा रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुखांनी केला आहे.
---
लीलावती रुग्णालयाला महापालिकेची नोटीस
एमआरआय कक्षात खासदार नवनीत राणा यांचा फोटो काढल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने लीलावती रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. एमआरआय कक्षात मोबाईल वापरण्यास तसेच फोटो काढण्यास बंदी असताना राणांच्या बाबत झालेल्या प्रकाराबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाकडून नोटिशीला उत्तर मिळणे अपेक्षित आहे. या प्रकरणात नोटिशीला योग्य उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81721 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top