राणांच्या घराची पालिकेकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणांच्या घराची पालिकेकडून पाहणी
राणांच्या घराची पालिकेकडून पाहणी

राणांच्या घराची पालिकेकडून पाहणी

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ ः मुंबई महापालिकेच्या पथकाने आज (ता. ९) नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानाची पाहणी केली. एच-पश्चिम विभागाच्या पथकाने राणांच्या निवासस्थानाच्या केलेल्या पाहणीनुसार, मंजूर आराखड्याच्या तुलनेत राणांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळले आहे. या अनधिकृत बांधकामाविरोधात राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून नोटीस पाठवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्या निदर्शनास आलेल्या अनियमिततेनुसार कारवाई केली जाणार आहे. राणांच्या निवासस्थानाची पाहणी पूर्ण झाली असून लवकरच त्यांना अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबत नोटीस पाठवली जाणार असल्याचे सांगितले. इमारतीच्या बाल्कनीत वाढीव एफएसआय आढळला आहे. याठिकाणी कारवाईबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81726 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top