नेरुळमध्ये १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरुळमध्ये १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू
नेरुळमध्ये १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू

नेरुळमध्ये १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.९ (वार्ताहर): नेरूळ सेक्टर-१४ मधील पामबीच मार्गालगत असलेल्या एमराल्डबे या इमारतीत राहणाऱ्या ५१ वर्षीय महिलेचा त्या राहत असलेल्या १७ व्या मजल्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. मीना प्रकाश जैन असे या घटनेतील मृत महिलेचे नाव असून सदर महिला इमारतीवरून खाली पडली की तिने स्वत:हून इमारतीवरून उडी टाकली, हे अद्याप स्पष्ट न झाल्याने नेरूळ पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.
नेरूळ सेक्टर-१४ मधील पामबीच मार्गालगत असलेली एमराल्डबे ही इमारत उच्चभ्रूंची इमारत म्हणून ओळखली जाते. याच इमारतीत १७ व्या मजल्यावर मीना प्रकाश जैन या कुटुंबासह राहण्यास होत्या. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील नोकर काम करत असताना, मीना जैन या घरातून खाली पडल्या. त्या पहिल्या मजल्यावरील पोडीयमवर पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे इमारतीतील सुरक्षा रक्षकाने पहिल्या मजल्यावरील पोडीयमवर जाऊन पाहणी केली असता, मीना जैन या जखमी अवस्थेत पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने याबाबतची माहिती मीना जैन यांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. मीना जैन या इमारतीतून खाली पडल्या की त्यांनी स्वत: इमारतीवरून उडी टाकली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81727 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top