ठाणे एअरफोर्स स्टेशनचे सुशांत बिश्वास नवे प्रमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे एअरफोर्स स्टेशनचे 
सुशांत बिश्वास नवे प्रमुख
ठाणे एअरफोर्स स्टेशनचे सुशांत बिश्वास नवे प्रमुख

ठाणे एअरफोर्स स्टेशनचे सुशांत बिश्वास नवे प्रमुख

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ ः ठाणे एअरफोर्स स्टेशनचे प्रमुख (स्टेशन कमांडर) म्हणून आज ग्रूप कॅप्टन सुशांत बिस्वास यांनी ग्रूप कॅप्टन शेखर शर्मा यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. बिस्वास यांनी कॉलेज ऑफ एअर वॉरफेअरमधून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना लढाऊ विमानांचे उड्डाण आणि क्षेपणास्त्र यंत्रणा यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी हवाई दलात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. यापूर्वी ते दक्षिण पश्चिम हवाईदल मुख्यालयात प्रमुख एअर डिफेन्स ऑफिसर (क्षेपणास्त्रे) म्हणून काम करीत होते. त्यांना यापूर्वीच्या कामगिरीबद्दल विशिष्ठ सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. ठाण्याचे एअरफोर्स स्टेशन हे येऊरच्या डोंगरावर असून तेथे हवाई संरक्षण यंत्रणा तैनात आहे. शत्रूची लढाऊ विमाने या यंत्रणेद्वारे नष्ट केली जाऊ शकतात. तर मुंबईतील मालाड जवळच्या मढ बेटांवर हवाई संरक्षणात उपयुक्त ठरणारी रडार यंत्रणा सज्ज आहे. मुंबईवर चालून येणाऱ्या शत्रूच्या लढाऊ विमानांचा दूरवरून छडा लावण्याचे काम ते करतात. मुंबईतील प्रमुख ठिकाणांचे रक्षण करण्यात ठाणे एअरफोर्स स्टेशन महत्वाची भूमिका बजावते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81728 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top