स्टेनो बदल्यांवरून कर्मचारी संघटनांमध्ये वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेनो बदल्यांवरून 
कर्मचारी संघटनांमध्ये वाद
स्टेनो बदल्यांवरून कर्मचारी संघटनांमध्ये वाद

स्टेनो बदल्यांवरून कर्मचारी संघटनांमध्ये वाद

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : शासनाच्या बदली धोरणानुसार ३१ मेपर्यंत सर्वच विभागांमध्ये सर्वसाधारण बदल्या पार पडतात. राज्य परिवहन विभागातही आरटीओ पातळीवर बदलीचे जोरदार वारे वाहत आहे, मात्र यामध्ये आरटीओतील स्टेनोपदावरील कर्मचाऱ्यांची अद्याप ज्येष्ठता यादी तयार नसल्याने कर्मचाऱ्यांकडून बदल्यांना विरोध केला जात आहे. शिवाय परिवहन आयुक्तांनाही याबाबत पत्र पाठवण्यात आले. इतर कर्मचाऱ्यांकडून मात्र स्टेनोपदाच्या बदल्या झाल्या पाहिजेत, असा आग्रह केला जात आहे.
आरटीओतील विविध पदांवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या सध्या सुरू आहे. बदलीचे अधिकार आरटीओ अधिकाऱ्यांना असून, प्रत्यक्षात समुपदेशन करून या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे आवश्यक आहे, मात्र समुपदेशन न करताच बदल्या केल्या जात आहे. अडचणीच्या ठिकाणी बदल्या देऊन कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असल्याचेही अनेक कर्मचारी नाव न लिहिण्याचा अटीवर सांगत आहे. मुख्यतः यामध्ये आरटीओ अधिकाऱ्यांचे स्टेनो मात्र यावेळी तरी बदलतील का बघावं लागणार आहे. वर्षानुवर्षे एकच टेबल सांभाळत हितसंबंध जोपासून गैरप्रकाराच्या घटना सुद्धा यापूर्वी घडल्या आहे, मात्र त्यानंतरही अद्याप स्टेनोच्या बदल्या प्रलंबितच आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81733 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top