उथळसर प्रभाग समितीमधील विकासकामांची आयुक्तांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उथळसर प्रभाग समितीमधील विकासकामांची आयुक्तांकडून पाहणी
उथळसर प्रभाग समितीमधील विकासकामांची आयुक्तांकडून पाहणी

उथळसर प्रभाग समितीमधील विकासकामांची आयुक्तांकडून पाहणी

sakal_logo
By

ठाणे, ता. १० ः ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी (ता. ९) उथळसर प्रभाग समिती परिसरातील स्वच्छतेसह ड्रेनेज, डीपी रस्ता तसेच रंगरंगोटी कामांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान शहरात सुशोभीकरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधितांना दिले.
स्व. मीनाताई ठाकरे चौक सुशोभीकरण प्राधान्याने सुरू करणे, शहरातील सर्व उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करणे, जोगिला तलाव पुनर्विकास प्रकल्प त्वरित सुरू करणे, मुस्लिम कब्रस्तान आवश्यकतेनुसार माती उपलब्ध करून देणे, मनोरपाडा तसेच आंबेडकर रोड परिसरात निर्मल अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार पुढील कार्यवाही करणे, मनोरपाडा परिसर, मनोरपाडा ते आंबेडकर रोडपर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे, आंबेडकर रोड नाल्यावरील दोन ब्रिजचे स्ट्रक्चर ऑडिट करून पुढील कार्यवाही करणे, आंबेडकर रोड परिसरातील दोन धोकादायक शौचालयांच्या जाहिरातीचे अधिकार प्रदान करून पुनर्बांधणी करणे आदी कामांसदर्भात पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी निर्देश दिले. आयुक्तांच्या या पाहणी दौऱ्यात माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेविका नम्रता कोळी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त शंकर पाटोळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81738 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top