ठाण्याला मिळणार १० एमएलडी अतिरिक्त पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्याला मिळणार १० एमएलडी अतिरिक्त पाणी
ठाण्याला मिळणार १० एमएलडी अतिरिक्त पाणी

ठाण्याला मिळणार १० एमएलडी अतिरिक्त पाणी

sakal_logo
By

ठाणे, ता. १० ः ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या कोट्यातून अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून मुंबई महापालिकेकडून ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर झाला आहे.
ठाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या पाईपलाईनद्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच, मुंबई महापालिकेलाही यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेनेही मुंबई महापालिकेकडे पाण्याची मागणी केली होती.
त्यानुसार मुंबई महापालिकेने ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे.

ठाणे महापालिका करणार प्रक्रिया
मुंबई पालिकेकडून मिळणारे पाणी हे प्रक्रिया न केलेले असणार आहे. ठाणे महापालिका त्यावर प्रक्रिया करून प्रामुख्याने वागळे इस्टेट परिसराला या पाण्याचा पुरवठा करणार आहे. या निर्णयाबद्दल शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिका आयुक्त चहल यांचे आभार मानले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81740 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top