नाले सफाईला मुहूर्त मिळाला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाले सफाईला मुहूर्त मिळाला!
नाले सफाईला मुहूर्त मिळाला!

नाले सफाईला मुहूर्त मिळाला!

sakal_logo
By

कल्याण, ता. १० (बातमीदार) ः पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना कल्याण डोंबिवली पालिकेकडून नालेसफाईच्या कामाला मुहूर्त सापडत नव्हता, याविषयी ‘सकाळ’ने २८ एप्रिलला ‘नालेसफाईला मुहूर्त मिळेना’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर पालिकेला जाग आली. सोमवारी (ता. ९) पालिकेने नालेसफाई तसेच पावसाळापूर्वी कामे करण्याचे आदेश दिले आहेत. १० प्रभाग क्षेत्रासाठी प्रभागनिहाय जलनि:सारण विभागामार्फत ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालिकेने संबंधित ठेकेदारांना काम करण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत ९५ किलो मीटर लांबीच्या ९७ महत्त्वाच्या मोठया नाल्यांची दरवर्षी पावसाळ्या पूर्वी नाले सफाई केली जाते. ही नालेसफई मे अखेरपर्यंत होणे आवश्यक असते; अन्यथा पावसाळ्यात नाले तुंबण्याच्या घटना घडतात. मात्र, यंदा मे महिना सुरू होऊनदेखील नालेसफाईबाबत हलचाली सुरू नसल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे ‘नालेसफाईला मुहूर्त मिळेना’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर पालिकेने सोमवारी नालेसफाईचे आदेश दिले आहे. दरम्यान प्रभाग क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या छोट्या व मध्यम स्वरूपाच्या गटाराच्या कामासाठी निविदा न मागविता पालिकेमार्फत दैनंदिन कंत्राटी कामगारांमार्फत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता करण्यात येणार आहे. यामुळे खर्चात बचत होईल, असा दावा पालिकेने केला आहे.

नागरिकांकडून स्वागत
पावसाळ्यापूर्वी बहुतांश नालेसफाई करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. पालिकेने नालेसफाईचे काम सुरू केल्याने नागरिकांनी स्वागत केले असून यावर्षी शहरात पाणी तुंबणार नाही, असा आशावाद व्यक्त केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81741 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top