गटारातील गाळ रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गटारातील गाळ रस्त्यावर
गटारातील गाळ रस्त्यावर

गटारातील गाळ रस्त्यावर

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. १० (बातमीदार) ः जोगेश्‍वरी पूर्वेतील सर्वोदयनगर, विकासनगर, आघाडीनगर, मेघवाडी तसेच इतर रस्‍त्‍यांवरील लहान मोठ्या गटारांतून व नाल्‍यांतून काढण्यात आलेला गाळ गेल्या चार दिवसांपासून रस्त्यावर, फुटपाथवर तसाच पडून आहे. गटारातून काढलेला ओला कचरा तातडीने उचलला जात नाही. वाळल्यानंतर तो उचलला जातो, असे ठेकेदार सांगतात. मात्र गाळ वाळल्यानंतर आहे तसाच पडून आहे. बस थांब्‍याशेजारीही गाळाचा ढीग रचून ठेवण्‍यात आल्‍यामुळे बस थांब्‍यावर वाट पाहणे अडचणीचे झाले आहे. परिसरात दुर्गंधी आणि रोगराई पसरण्‍याची भीती नागरिकांमधून व्‍यक्‍त होत आहे. संबंधित विभागाने हा गाळ वेळीच उचलण्‍याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81745 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top