शेटवाडी नाल्याच्या सफाईस सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेटवाडी नाल्याच्या सफाईस सुरुवात
शेटवाडी नाल्याच्या सफाईस सुरुवात

शेटवाडी नाल्याच्या सफाईस सुरुवात

sakal_logo
By

धारावी, ता. १० (बातमीदार) : धारावीतील शेटवाडी नाला गाळाने व कचऱ्याने तुडुंब भरला होता. उशिरा जाग आलेल्या महापालिकेने आता नालेसफाईस सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
शेटवाडी नाल्यात जमा झालेल्या गाळाची दुर्गंधी परिसरातील रहिवाशांना सहन करावी लागत होती. दुर्गंधीमुळे आजारपणात वाढ झाली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. नाले सफाई होत नसल्याने विभागात दुर्गंधी सोबतच मच्छर, डास, कीटकांचा त्रास वाढला होता. नाला सफाईचे काम दरवर्षी उशिरानेच केले जाते. यामुळे नाला व्यवस्थित साफ होत नसल्याची तक्रार स्थानिक करतात. विभागाच्या आजूबाजूला असलेल्या अनेक कारखान्यांचे सांडपाणी व शौचालायांची घाण नाल्यात वाहत राहते. त्यामुळे नाल्याजवळून जाताना पादचाऱ्यांना नाक मुठीत घेऊन जावे लागते. नाल्याजवळील घरांतील रहिवाशांना नाल्याच्या दुर्गंधीमुळे घराच्या खिडक्या उघडता येत नाहीत. मुंबईतील नालेसफाईस एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81747 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top